प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली: पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिवंगत एस. के. पाटील (काका) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समूह गायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल Schoolच्या सीनियर कॉयर ग्रुपने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या संघाला ₹३,००० रोख पारितोषिक तसेच आकर्षक करंडक (ट्रॉफी) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक प्रशांत भाटे आणि मयूर जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे शाळेने ही मानाची कामगिरी केली.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे, संगीत शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना भविष्यातही अशाच स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या