सांगली प्रतिनिधी : स्वराज्य रक्षक, स्वामिनिष्ठ देशभक्त वीररत्न शिवा काशिद यांच्या 366 व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता गावभाग, सांगली येथील श्री संत सेना महाराज मंदिर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर संत सेना महाराज मंदिर येथून वीरगती स्मरणार्थ भव्य रॅली काढण्यात येईल. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन तेथे अभिवादन करून समाप्त होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सांगली शहरातील सर्व सलून व्यावसायिक व नाभिक बांधवांनी सकाळी 9 वाजता संत सेना महाराज मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी सांगली शहरातील सर्व सलून व युनिसेक्स सलून दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.
याच निमित्ताने हेअर कटिंग व हेअर स्टाईल स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सांगली येथील खिलारे मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यासह सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सलून व्यावसायिकांनी सहभागी होऊन आपल्या कलेचा आविष्कार सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सेना सेवा संघाचे अध्यक्ष अरुण साळुंखे, संत सेना महाराज सलून असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गंगधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून स्कायवे अकॅडमी यांच्या पुरस्कृत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या