सांगली प्रतिनिधी : शिवसेना नेते, विधिमंडळाचे मुख्य प्रतोद तथा दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे यांच्या संयोजनातून सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सांगली महानगरपालिका शाळा क्रमांक ४२ येथे झालेल्या कार्यक्रमात गरीब व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, उपजिल्हा संघटक संतोष पाटील, सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे, प्रशांत पवार, शाखाप्रमुख सागर धनवे, सामाजिक कार्यकर्ते सुनील तिवले तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. प्रबोधिनी पतंगे, सहाय्यक शिक्षिका सौ. श्वेता कोळी, कु. कल्पना झरेकर, सहाय्यक शिक्षक श्री. गणपती उघडे, बालवाडी शिक्षिका सौ. वैशाली जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी आमदार सुनील प्रभू यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि नागरिकांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाचे संयोजन शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या