सांगली प्रतिनिधी : महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, सांगली येथे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने इंग्लिश क्लबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालशिक्षणतज्ञ सौ. किंजल शाह, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या व्यवस्थापिका डॉ. मानसी सोनलकर मॅडम, सहव्यवस्थापिका सौ. सुप्रिया चोपडे मॅडम उपस्थित होत्या.
सौ. किंजल शाह यांनी बालवयापासूनच इंग्रजी भाषेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे असून, इंग्लिश क्लब विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. मानसी सोनलकर यांनी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले. इंग्लिश क्लबमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौ. सुप्रिया चोपडे यांनी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, वक्तृत्व, कथा-कथन, वादविवाद आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन भाषेवरील प्रभुत्व वाढवावे, असे सांगितले. सातत्यपूर्ण सराव हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी या क्लब चे विद्यार्थी अध्यक्ष म्हणून कु. अनमोल माळी तर उपाध्यक्ष म्हणून कु. संकल्प सांगलीकर यांची निवड झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आराध्या गवळी व कु. बालिका कांबळे यांनी अतिशय प्रभावीपणे केले. तर आभारप्रदर्शन कु. रश्मिता पाटील हिने केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाली थोरात, इंग्लिश क्लब च्या शिक्षिका प्रियांका भुसारी, तस्नीमआरा सय्यद, इंद्रायणी महाजन, प्रतिभा आठवले तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी नियोजन पाहिले. तसेच पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
इंग्लिश क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या