सांगली (प्रतिनिधी) : बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्लेसमेंट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सौ.पूजा (वहिनी) विशाल दादा पाटील, बन्सीलाल बोबडे, रणजीत कळढोणे, महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर संतोष मोहिते , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आरिफ बुकसेलर उपस्थित होते .संचालक डॉक्टर संतोष मोहिते यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत वेगवेगळ्या कंपन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची नाते आणखी घट्ट करावे. पीव्हीपीआयटीला उच्च दर्जाची शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची संचालक डॉक्टर संतोष मोहिते यांनी माहिती दिली .महाविद्यालय वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. आयआयटी कानपूर साठी निवड झालेल्या निरंजन कुलकर्णी या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच माझी नऊ कंपन्यांमध्ये निवड झाली ."आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण खूप काही करू शकतो" असे निरंजन कुलकर्णी यांनी सांगितले . यावेळी अनेक पालकांनी आपले मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाने घेतलेल्या परिश्रमामुळेच आमच्या मुलांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. पालकांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. टाटा ऑटो कॉमचे बन्सीलाल बोबडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त केले . "नम्र रहा , नवनवीन कौशल्य शिकण्याची वृत्ती जोपासा, कामात सातत्य ठेवा प्रामाणिक राहा "असा मौलिक सल्ला दिला. बोबडे यांनी त्यांच्या उत्पादनांबद्दलही माहिती दिली. त्यांच्या कंपनीत पी.व्ही. पी. आय. टी चे अनेक विद्यार्थी उत्कृष्ट काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सौ. पूजावहिनी विशाल दादा पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनी आमच्या महाविद्यालयावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल सर्व पालकांचेही त्यांनी आभार मानले. येणाऱ्या काळात महाविद्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा "असे आवाहन केले. "विद्यार्थ्यांनी सध्याच्या परिस्थितीत सजग राहून नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे कौशल्य आत्मसात करावे "असे त्या आपल्या त्या म्हणाल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर अनुष्का पाटील ,परीक्षा विभागाचे प्रमुख प्राध्यापक सावन वाणी ,परीक्षा विभागाच्या सह प्रमुख प्राध्यापिका अर्चना भंडारे यांचा विशेष कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष खासदार विशालदादा पाटील विश्वस्त अमितदादा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका साधना पाटील , विद्यार्थिनी संस्कृती चव्हाण यांनी केले .डॉ. स्नेहा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.शितल गुंजाटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या