प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण, उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
तसेच यूथएड फाउंडेशनच्या अश्विनी जाधव यांनी स्वयंरोजगार, उद्योजकता आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत महिलांना उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले.
शिबिरात उपस्थित महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. महिला उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारे हे शिबिर प्रेरणादायी ठरल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या