अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शिवराज काटकर यांचा प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते सत्कार
By -
जून १५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तरुण भारतचे संपादक शिवराज काटकर यांचा सत्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.
प्रदीप आप्पा कदम म्हणाले, शिवराज काटकर हे पत्रकारितल मोठं नाव आहे, तरी तो लेखन करून नेते प्रशासन आणि पोलिसांना ताळ्यावर आणण्याचे काम ते करत आहेत. अत्यंत परखडपणे ते बातम्या लिहितात. त्यांचे अग्रलेख सरकारला जागे करतात. सर्वसामान्य पत्रकारांचा आवाज म्हणजे शिवराज काटकर आहेत. पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी सर्वात पुढे असतात. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली ही सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आम्ही त्यांचं कौतुक करतो.
शिवराज काटकर म्हणाले, जबाबदारी वाढली आहे आपल्याला या माध्यमातून देशभर काम करण्याचे संधी मिळाली आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो परंतु हे कर्तव्य करत असताना अनेक अडचणींना त्याला सामोरे जावे लागते. देशभरातल्या विविध विभागातल्या पत्रकारांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्या समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पलूस मध्ये घेतलेला हा सत्कार निश्चितपणे लक्षात राहील. प्रदीप आप्पा कदम सर्वसामान्य माणसांसाठी राबत आहेत. नवे उपक्रम राबवत आहेत आणि त्या माध्यमातून या भागाचा विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही नेहमीच त्यांच्या सोबत आहोत.
यावेळी करिअर मार्गदर्शक तोहीद मुजावर, दैनिक तरुण भारतचे उपसंपादक सुभाष वाघमोडे, वितरण प्रमुख अनुप पुरोहित, वितरण अधिकारी विजय तोरगलकर, संजय पवार, शिवाजी माने, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम धायगुडे, घनश्याम मोरे, यशवंत कुंभार, वैभव माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सचिव महेश साळुंखे , अमीर पठाण, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी उपस्थित होते.
अभिजीत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या