प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
कुपवाड : प्रभाग क्रमांक ८ मधील विद्यानगर, गल्ली क्रमांक ६ येथे, झालेल्या जोरदार पावसानंतर गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी काही घरांमध्ये शिरले. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. महानगरपालिकेचे नियमित कर्मचारी त्या वेळी उपलब्ध नसतानाही त्यांनी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या सहकार्याने त्वरित खाजगी सफाई कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवून स्वतः जागेवर थांबून गटारे साफ करण्याची व्यवस्था केली.
सफाई कर्मचाऱ्यांनी पावसातच गटारांमधील कचरा व अडथळे हटवून निचऱ्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा झाला आणि घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील व नगरसेविका मीनाक्षी पाटील यांचे आभार व्यक्त केले. पावसाळ्यात अशा समस्यांवर तत्परतेने उपाययोजना होत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या