सांगली प्रतिनिधी : प्रतिष्ठा न्यूज म्हणजे तत्वनिष्ठ पत्रकारितेचे आदर्श उदाहरण आहे असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले. प्रतिष्ठा न्यूज ७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबीर व झिंदाबाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संजयकाका पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्य रमेश गायकवाड यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही येथे संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी हे प्रमुख उपस्थित होते. एम आय एस ब्लड बँकेच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रस्ताविक करताना प्रतिष्ठान न्यूज संपादक तानाजीराजे जाधव म्हणाले, प्रतिष्ठा न्यूज ची वाचक संख्या जानेवारी २०२६ पासून दर महिन्याला १ लाख २० हजार झाली इतकी आहे. गेल्या सात वर्षांपासून आम्ही अनेक चढउतार पाहिले परंतु वाचक जाहिरातदार आणि राज्यातील सर्व प्रतिनिधी यांनी प्रोत्साहन दिले, सहकार्य केले सर्वजण प्रतिष्ठा न्यूज या परिवारातील सदस्य झाले. आम्ही नेहमीच बातमी मागची बातमी देण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठान न्यूज बरोबर प्रतिष्ठा प्रमोटर्स ही प्रकाशन संस्था आणि झिंदाबाद मीडिया या माध्यमातून राजकीय क्षेत्रात आम्ही व्यवसायिक दृष्ट्या प्रगती केली आहे. लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
यावेळी बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, तानाजी जाधव यांनी अत्यंत नेटाने आणि कष्टाने आपली वाटचाल केली आहे. प्रतिष्ठान न्यूज म्हणजे तत्वनिष्ठ पत्रकार्तेचे एक आदर्श आणि मूर्तीमंत असे उदाहरण आहे. नक्कीच त्यांनी यशस्वी अशी वाटचाल केली आहे. त्यांच्या सर्व प्रतिनिधी आणि कुटुंबीय या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत आहेत म्हणूनच ते हे सर्व करू शकले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम म्हणाले, तानाजीराजे जाधव म्हणजे एक परखड आणि कणखर असे पत्रकार आहेत. जे सत्य आहे तेच ते मांडतात. अशा पत्रकारांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे. आज प्रतिष्ठा न्यूज च्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला मी सर्वांना शुभेच्छा देतो.
प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी तानाजी जाधव यांच्या पत्रकारीतेचा आढावा घेतला. लतीफ तांबोळी यांनी शुभेच्छा दिल्या.
आभार आनंदराव जाधव यांनी मांडले. कवयित्री डॉक्टर स्वाती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संजय कुमार शिंदे, रोहित पाटील, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, अनिल पाटील, सचिन कुराडे, प्रथमेश पाटील, सुनील कांबळे, जमीर पठाण, सोहेल पठाण उपस्थित होते. प्रतिष्ठा न्यूज चे उपसंपादक योगेश रोकडे, प्रसाद साळुंखे, एम एस आय ब्लड बँकेच्या डॉक्टर किरण बरगाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठा न्यूजच्या व्यवस्थापकीय संपादक सौ विद्या जाधव, प्रतिष्ठा जाधव, पूर्णांक जाधव , सौ. ज्योती साळुंखे, दिलीप रोकडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अमीर पठाण, प्रा. रमेश गायकवाड, रामभाऊ लगाडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा झिंदाबाद महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी असे,
झिदाबाद महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार
श्रीमती संजीवनी प्रमोद काळे
-शिक्षक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या सर्किट हॉऊस कॅम्प, आमरावती
मा. श्री. रामभाऊ नारायण लगाडे
-सामाजिक कार्यकर्ते मु. पो. वाशी ता. वाशी जि. धाराशिव
श्री. दौलतराव अनिल पाटील
-सामाजिक कार्यकर्ते मु. पो. अंखलखोप, ता. पलूस जि. सांगली
श्री. अमिरखान सरदारखान पठाण
-संस्थापक, स्वर्गिय मौलाआबा पठाण बहुउद्देशीय सामाजिक संस्था मु. पो. रामानंदनगर, ता. पलूस जि. सांगली
सौ. मनिषा रमेश पवार
-संस्थापक, राजनंदिनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मु. पो. बांबवडे, ता. पलूस जि. सांगली
झिदाबाद महाराष्ट्र क्रीडाभूषण समाजभूषण पुरस्कार
पै. श्री. संभाजी शामराव जाधव
-संस्थापक, संभाजी पैलवान पुणदी कुस्ती केंद्र मु. पो. रामानंदनगर, ता. पलूस जि. सांगली
झिंदाबाद महाराष्ट्र शिक्षण भूषण पुरस्कार
-सौ. गितांजली उदय सुतार पंचक्रोशी विद्यानिकेतन, निमणी
झिदाबाद महाराष्ट्र उद्योगभूषण समाजभूषण पुरस्कार
-मा. श्री. सौरभ धनाजी जाधव
उद्योजक - साईराम ट्रेडर्स, सावळज ता. तासगाव जि. सांगली
श्रीमती अश्विीनी योगेश राडे
-उद्योजिका - श्री सिध्दी इंजिनिअरींग वर्क्स, पलूस
झिदाबाद महाराष्ट्र साहित्यभूषण समाजभूषण पुरस्कार
मा. श्री. रमेश शंकर गायकवाड
-साहित्यिक, कलाकार, प्रबोधनकार कुंडल ता. पलूस जि. सांगली
झिदाबाद महाराष्ट्र कृषिभूषण समाजभूषण पुरस्कार
मा. श्री. सुनिल शामराव भोसले
-सचिव - क्रांती भाजीपाला उत्पादक शेतकरी बचत गट बांबवडे ता. पलूस जि. सांगली
झिदाबाद महाराष्ट्र कलाभूषण समाजभूषण पुरस्कार
श्री. धनंजय उर्फ बंडू महादेव साळुंखे
-संगीत, नृत्य शिक्षक यशश्री इंग्लिश मिडियम स्कूल, सांडगेवाडी, ता. पलूस
श्री. शालमशहा मुलाणी - ज्येष्ठ अभिनेते उपाळे मायणी ता. कडेगाव जि. सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या