अंकलखोप, प्रतिनिधी : अंकलखोप येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज उत्साहपूर्ण वातावरणात विविध गावांतील तरुण कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते तसेच महेश हजारे आणि कुलदीप वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
अंकलखोप, भिलवडी, माळवाडी, नागठाणे तसेच परिसरातील विविध गावांतील तरुणांनी प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये आण्णा देवकुळे, प्रदीप देवकुळे, संदीप ग. वारे, अजय वारे, करण देवकुळे, अमर वारे, सिद्धांत भिंगारदिवे, अजय वायदंडे, विश्राम माने, सुजय मोटे, सौरभ मंडले, आदिनाथ कांबळे, भैय्या वाघमारे, आदर्श शिंदे, अभिजित बनसोडे, प्रथमेश दाभाडे, गणेश दाभाडे, अक्षय हेगडे, रमजान मुल्ला, मयूर लांडगे, आदित्य मरळे, लाला वायदंडे, आयुष मोरे, रवी पारशे, हुसेन डांगे, अमोल माने, अक्षय मोरे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रदीप आप्पा कदम यांचे हात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून आभार मानले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पलूस-कडेगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना भविष्यात अभिमान वाटेल असे लोकाभिमुख आणि विकासाभिमुख काम करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी संजय भाऊ शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, रणजित शिंदे, दौलत पाटील, सुदर्शन हजारे, अक्षय व्हरे, वैभव रांजणे, अतुल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या