विटा, दि. २२ जून : शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटणारे, बाधित शेतकरी व ग्रामस्थांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे ऍड. दिपक लाड यांना रविवारी विटा येथील मोर्चादरम्यान अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातील भावना पाहून उपस्थित हजारो माता-भगिनीही गहिवरल्या आणि आंदोलनस्थळी काही काळ अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले.
शक्तिपीठ विरोधी लढ्यासाठी स्वतःची तहान-भूक विसरून, प्रकृतीची पर्वा न करता गावोगावी जनजागृती करणाऱ्या ऍड. लाड यांनी अनेक संकटांचा सामना करत हा संघर्ष सुरू ठेवला आहे. प्रकृती अस्वस्थ असतानाही शरीरातील वेदना बाजूला ठेवून त्यांनी आंदोलनाची धुरा खांद्यावर घेतली. मात्र २२ जून हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा दिवस ठरला.
या दिवशी त्यांच्या आजोबांची, स्वातंत्र्यसैनिक व लोकचळवळीतील ज्येष्ठ नेते क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांची १०३ वी जयंती होती. आजोबांवर जीवापाड प्रेम करणारे ऍड. दिपक लाड दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा शक्तिपीठ विरोधी आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या धावपळीत त्यांना जयंतीच्या कार्यक्रमाकडे लक्ष देता आले नाही.
क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कुंडल येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यापूर्वी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ तसेच पद्मश्री ऍड. उज्ज्वल निकम यांसारख्या मान्यवरांना हा सन्मान देण्यात आला आहे.
यावर्षीचा पुरस्कार एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना जाहीर करण्यात आला होता. मात्र आंदोलनाचे कार्यक्रम आणि जयंतीचा नियोजित सोहळा एकाच काळात आल्याने यंदाचा कार्यक्रम नियोजित तारखेला होऊ शकला नाही.
विटा येथील मोर्चादरम्यान आजोबांच्या जयंतीची आठवण होताच ऍड. दिपक लाड भावूक झाले. त्यांच्या संघर्षशील वृत्तीमागे आजोबांनी दिलेले सामाजिक कार्याचे संस्कार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनातील महिला मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. “ऍड. दिपक लाड आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. --------------------------------------------
राष्ट्रवादी पक्षाच्या महिला नेत्या या हजारो महिलांच्या साक्षीने यावेळी म्हणाल्या दिपक लाड हा आपला रक्ताचे पाणी करून सर्वसामान्य जनतेसाठी जीवाचं रान करून जर लढत असेल तर आमचंही कर्तव्य आहे या भावाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हे माझं आम्ही मागील अनेक महिन्यापासून त्यांचा संघर्ष पहिला आहे , या आंदोलनाला जिवंतपणा दिपक लाड यांनी आणला आहे या भाषणाचा व्हिडिओ काल दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल. 🙏
दिपक दादा लाड यांच्या अवाहनाला महिलांनी दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि आंदोलनातील नारीशक्तीची साथ पाहून शक्तिपीठ विरोधी संघर्षाला अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. क्रांतिवीरांच्या विचारांचा वारसा जपत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा निर्धार करत प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर रक्त सांडू पण शक्तीपीठ होऊन देणार नाही असा चंग बांधला आहे लढवय्ये नेतृत्व अँड दिपक लाड यांनी. -
दिपक कदम- (बांबवडे ता पलूस) पलूस कडेगाव खानापूर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या