सांगली प्रतिनिधी : नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली आयोजित 57 व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील 18 व्या कै. बाबूकाका शिरगांवकर स्मृती फिडे रेटिंग रॅपिड् बुध्दिबळ स्पर्धेच्या नवव्या व अखेरच्या फेरीत सोलापूरचा मानस गायकवाड व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात मानसने रचलेल्या चालीना श्रीराजने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले अखेर दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह श्रीराजने ८ गुण ( बुकलोझ गुणाच्या जोरावर ) मिळवून रू. २५०००/- च्या रोख पारितोषिकासह कै. बाबूकाका शिरगांवकर चषक पटकाविले तर मानसला ८ गुणासह रू. १५०००/- च्या रोख पारितोषिकासह व ट्रॅाफीसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कोल्हापूरचा अभय भोसले व गोव्याचा मंदार लाड यांच्यातील डावात अभयने रचलेल्या चालीना मंदारने प्रत्युत्तर देऊन अभयचा ४६ व्या चालीला पराभव करून ८ गुणासह रू.१००००/- च्या रोख पारितोषिकासह व ट्रॅाफीसह तिसरे स्थान पटकाविले तर अभयने रेटिंग कॅटेगरीत ७ गुणासह रू. ५०००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह प्रथम स्थान पटकाविले.
कोल्हापूरचा अनिश गांधी व महाराष्ट्राचा सौरीश काशिळकर यांच्यातील डावात अनिशने सौरीशचा ४३ व्या चालीला पराभव करून ७.५ गुणासह रू. ७०००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह चौथे स्थान पटकाविले तर सौरीशने १७०० ते १७९९ रेटिंग कॅटेगरीत ७ गुणासह रू. २५००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह व्दितीय स्थान पटकाविले.
कोल्हापूरचा तन्मय पवार व कोल्हापूरचा शार्विल पाटील यांच्यातील डावात तन्मयने रचलेल्या चालीना शार्विलने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले व ३९ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह तन्मयने रेटिंग कॅटेगरीत ७ गुणासह रू. ५०००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह प्रथम स्थान पटकाविले. तर शार्विलने १६०० ते १६९९ रेटिंग कॅटेगरीत ७ गुणासह रू. ५०००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह प्रथम स्थान पटकाविले.
सांगलीचा रोहित मोकाशी व गोव्याचा ऋषीकेश परब यांच्यातील डावात रोहितने रचलेल्या चालीना ऋषीकेशने प्रत्युत्तर देऊन ३५ व्या चालीला रोहितचा पराभव करून ऋषीकेशने ७ गुणासह रू. ४०००/- च्या रोख पारितोषिक व मेडलसह सहावे स्थान पटकाविले तर रोहितला ६ गुणासह रू. १२००/- च्या रोख पारितोषिक व मेडलसह बाराव्या स्थानावर जावे लागले.
सांगलीचा मुदस्सर पटेल व पश्चिम बंगालचा आंतरराष्ट्रीयमास्टर श्रीजित पॅाल यांच्यातील डावात मुदस्सरने रचलेल्या चालीना श्रीजितने प्रत्युत्तर देऊन मुदस्सरचा ४० व्या चालीला पराभव केला व श्रीजितने ७ गुणासह रू. ५०००/- च्या रोख पारितोषिक व मेडलसह पाचवे स्थान पटकाविले तर मुदस्सरला ६ गुणासह ३५ वर्षावरील गटात रू.१५००/- च्या रोख पारितोषिक व ट्रॅाफीसह प्रथम स्थानावर जावे लागले
नवव्या फेरीअखेर गुण व विजेते – १) श्रीराज भोसले ( कोल्हापूर )-८
२) मानस गायकवाड ( सोलापूर )-८ ३) मंदार लाड ( गोवा )-८
४) अनिश गांधी ( कोल्हापूर )-७.५ ५) श्रीजीत पॅाल ( प. बंगाल)-७.५
६) ऋषिकेश परब ( गोवा)-७ ७) दिशा पाटील ( कोल्हापूर )-७
८) मोहम्मद खॅांज लतिफ (आंध्रपदेश )-७ ९) अभिषेक पाटील ( सांगली)-६.५
१०) अनिश नाईक ( गोवा )-६.५ ११) ऋषिकेश कबनूरकर ( कोल्हापूर)-६.५
१२) रोहित मोकाशी ( सांगली)-६.५ १३) रिषीत गवस ( गोवा)-६
१४) दिव्या पाटील ( कोल्हापूर)-६ १५) आदित्य खैरमोडे ( सागंली)-६
१६) श्रीश कुलकर्णी ( महाराष्ट्र )-६ १७) संगमेश सुगंधी ( कर्नाटक)-६
१८) अरीन कुलकर्णी ( कोल्हापूर)-६ १९) भुवन शितोळे ( पुणे )-५.५
२०) दत्ता कांबळी ( गोवा)-५.५
१७०० ते १७९९ रेटिंग उत्कृष्ठ -१) अभय भोसले,सौरीश काशिळकर,आर्यन रायकर,बाळकृष्ण पेडणेकर ,स्वरूप साळवे, १६०० ते १६९९ रेटिंग उत्कृष्ठ -१) शार्विल पाटील, सोहम देशमुख,अथर्व तावरे, ओंकार सावर्डेकर, व्यंकटेश खाडेपाटील, १५०० ते १५९९ रेटिंग उत्कृष्ठ -१) तन्मय पवार, संतोष सरीकर,सौमित्र केळकर, आदित्य टिळक,
अर्णव शेडगे, १४०० ते १४९९ रेटिंग उत्कृष्ठ -१) नागेश राजमाने,देवदत्त पटवर्धन,आदित्य कोळी,अर्णव रतवाळ,तेजस चोडणेकर, , उत्कृष्ठ बिगर मानांकित-१) प्रज्ञेश घोरपडे, बीद्रीनारायण संकरा, ओजस व्हनमाने, आयुष जांगीवाला, सूर्यतेज यादव,उत्कृष्ठ महिला
खेळाडू १) श्रीया हिप्परगी,रिया लाहोटी,साजिरी देशमुख,काव्या दबडे,स्वरा बावडेकर,
उत्कृष्ठ ५५ वर्षावरील-१) माधव देवस्थळी, राजू सोनेचा,दिलीप गोळवणकर, दिलीप कुलकर्णी,अविनाश चपळगावकर उत्कृष्ठ ३५ वर्षावरील-१) मुदस्सर पटेल,संतोष रामचंद्रे,
जितेश बावळेकर, संदिप माने, विश्वेश्वरीया गुरूमठ, उत्कृष्ठ १६ वर्षावरील-१) अरविंद अय्यर
सौम्यदिप चक्रबर्ती ,प्रणव हळभावी,अथर्व चौगुले,आदित्य कोळी उत्कृष्ठ सांगली-१) ईश्वरी जगदाळे,दिग्विजय पाटील,आशइष मोटे,सहर्ष ठोकळे,स्पर्श लव्हाळे, उत्कृष्ठ सातारा-१) ओंकार कडव,अर्जुन अडगळे,मल्हार पालकर,सार्थक जाधव,ओंकार ओतारी, उत्कृष्ठ कोल्हापूर -१) प्रथमेश लोटके,राजदिप पाटील,संतोष कांबळे,प्रणव मोरे,श्रेयस पाटील, उत्कृष्ठ सोलापूर-१) आदिराज म्हेत्रे,सर्वेश बेद्रे ,श्रेयस इंगळे,चंद्रशेखर बसर्गीकर,विनय रानसुबे,
१६ वर्षाखालील मुले-१) आदित्य चव्हाण, राजस डहाळे,शिवगंराजआयव्हिळे,पार्श्व लिगाडे
१४ वर्षाखालील मुले-१) सर्वेश पोतदार,नागेश नायक,प्रेम निचल,अशुंमन शेवडे,ऋचित मुके
१२ वर्षाखालील मुले-१) वरद पाटील,वेदांन्त बांगड,आराधअय ठाकूरदेसाई,अन्वय भिवरे
१० वर्षाखालील मुले-१)विराज कट्टीमणी,आदिराज डोईजड,अवनिश जितकर,नचिकेत तोंदळे
८वर्षाखालील मुले-१) रिधान कारवा,सौमित्र जोशी,रियांश कोतवाल,समर्थ पवार,रिशांन पिलनकर ,१६ वर्षाखालील मुली-१) आदिती कामत, अवनी कामत,सिध्दी वरूडे,पूर्वा पाटील
प्रणोती कणसे, १४ वर्षाखालील मुली-१) तन्मयी घाटे,सिध्दी कर्वे,सृष्टी जोशीराव,अरूधंती चव्हाण, स्वरा जाधव, १२ वर्षाखालील मुली-१) माधवी देशपांडे,सान्वी बावळेकर,मुरील फर्नाडीस,आयुषी घोरपडे,अभिधा खैरे, १० वर्षाखालील मुली-१) सांची बजाज, प्रणिता मडोली, आर्वी भद्रे,मिहीका पोर्लकर,हर्षा क्षिरसागर, ८ वर्षाखालील मुली-१) परी पाटील,
स्वरांजली पाटील, स्वरांजली जाधव,दिव्यंका नार्वेकर,उत्कृष्ठ खेळाडू-१) अगस्तिया जाधव, उत्कृष्ठ अॅकेडमी-१) केपीज चेस ॲकेडमी,केन चेस ॲकेडमी, राजाचा खेळ ॲकेडमी, विश्वगंगा प्रतिष्ठान, पीआर चेस वल्ड , जीएम चेस ॲकेडमी, मुक्ताई ॲकेडमी, समर्थ कृपा, कराड चेस क्लब आणि ॲकेडमी, युआन स्पोर्टस ॲप्लीकेशन
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विद्यावाचस्पती डॅा. संजय कोटणीस महाराज, सौ. स्वरूपा कोटणीस, सौ. निशा गाडगीळ- घोरपडे, मा. अभिजीत घोरपडे यांच्याहस्ते सौ. स्मिता केळकर, डॅा. उल्हास माळी, चिंतामणी लिमये, श्रेयस पुरोहित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे , पवन राठी ( पुणे )फिडे पंच दिपक
वायचळ (सांगली ), सिनिअर राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा ( सोलापूर ) अपर्णा शिंदे ( सातारा ), रोहित पोळ ( इचलकरंजी ) , शांताला शेवडे ( बेळगांव ) यश लोहाना ( कराड ), सूर्याजी भोसले ( कोल्हापूर ) मोहिनीराज डांगे ( इचलकरंजी ) नाझिया पटेल ( मिरज ) सौ. अमृता पंडित( सांगली) आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तपासे ( सातारा ) यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या