सांगली प्रतिनिधी : सांगलीवाडी येथील तरुण मराठा व्यायाम मंडळातर्फे आयोजित भव्य कार्यक्रमात कबड्डी मॅटचे लोकार्पण व मंडळातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिगृह समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते कबड्डी मॅट प्रदान करण्यात आले. तरुण मराठा परिवाराचे कुंटुंब प्रमुख माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू बापू सरगर (मंडळ अधिकारी, रायगड) यांच्या सहकार्याने खेळाडूंना मॅट देण्यात आली.
तसेच शासकीय व निमशासकीय खेळात भारती झालेल्या मंडळाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे माजी खेळाडू लिंगप्पा सरगर यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड, तसेच महाबळेश्वर चौगुले यांची सांगलीवाडी सोसायटीचे चेअरमनपदी निवड यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक शेखर माने, बापू सरगर, बोट क्लबचे अध्यक्ष विनू जमदार, तरुण मराठा सोसायटीचे चेअरमन पै. आकाराम कदम, श्री हनुमान वाचनालयाचे उपाध्यक्ष महेश जमदार, महाराष्ट्र ग्रंथ असोसिएशनचे संचालक दीपक हरगुडे, शशिकांत शिंदे, दीपक यादव, पांडुरंग पाटील, शुभम पाटील, सचिन दडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे तरुण मराठा व्यायाम मंडळाच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून मंडळाच्या लौकिकात भर पडली आहे. मंडळाचे कार्य व खेळाडूंची कामगिरी यामुळे सांगलीवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या