समडोळी प्रतिनिधी :श्री सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे क्षपकराज आचार्यश्री प. पू. १०८ वर्धमानसागरजी महाराज (दक्षिण) यांची यम-सल्लेखना सुरू आहे. आगम चक्रवर्ती आचार्य विद्यासागर महाराज यांच्या निर्देशानुसार सल्लेखना सुरू असून ससंघ विराजमान आहेत. जैन धर्माची महान परंपरा संयम, साधना आणि सल्लेखनाद्वारे आत्म शुद्धीचा सर्वोच्च मार्ग ! ही आराधना देहाच्या सीमा ओलांडून आत्म्याला शुद्ध, निर्मल आणि अनंताच्या दिशेने नेणारी आहे. हा देह क्षणभंगुर आहे पण आत्मा शाश्वत आहे .ही यमसल्लेखना म्हणजे देहाचा त्याग नसून, कर्मबंधनाचा क्षय आणि आत्मकल्याणाचा महाप्रवास आहे. महाराजांच्या आराधनेस उत्तरोत्तर निर्मलता व पूर्णता लाभो, हीच मंगल भावना व भावपूर्ण अनुमोदन देऊन सर्व श्रावक- श्राविका, वीर सेवा दल परिवार यांनी आपल्या गावातील जिन मंदिरामध्ये णमोकार महामंत्राचे जाप्य करावे असे आवाहन दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समिती मार्फत करण्यात आले आहे.
कुंथलगिरी येथे आचार्य वर्धमानसागर महाराज यांची यम-सल्लेखना सुरू
By -
जून २८, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या