‘उत्कृष्टतेला सलाम!’ लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा
By -
जून २७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मे महिन्याची जनरल मीटिंग उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.यावेळी रुग्णसेवेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या यशाचाही सन्मान करणारा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी हॉस्पिटलचे विविध विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये रिसेप्शन विभागाच्या ऋतुजा निकम, मेडिकल विभागाच्या सौ.प्रियांका अमृतसागर,लॅब विभागाच्या सौ.रूपाली पवार,नर्सिंग विभागाच्या सौ.काजल शिंदे,हाऊसकीपिंग विभागाच्या सौ.संजना रोकडे, अकाऊंट विभागाचे.मोहित पाटील, एचआर मॅनेजर सौ.श्रद्धा खराडे, मार्केटिंग व मेडिकल मॅनेजर संजय तुपे,सुपरवायझर विक्रम वीरकर, मेडिसीन विभागाचे डॉ.सुधाकर अल्मद,मेडिकल ऑफिसर डॉ. हर्षवर्धन देशमुख,हॉस्पिटलचे संचालक डॉ.शिवणकर,डॉ. माने-पाटील,घाटगे साहेब यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतिष्ठा न्यूज चॅनेलचे पत्रकार किरण कुंभार यांच्या हस्ते मे महिन्यात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ’, ‘बेस्ट इनचार्ज अवॉर्ड’, ‘बेस्ट टीम अवॉर्ड’ आणि ‘डायरेक्टर्स अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचीही दखल घेण्यात आली.गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.त्यामुळे हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणाचा न राहता, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा कौटुंबिक स्नेहमेळावा ठरला.लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ रुग्णसेवेचे केंद्र नसून,आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला, समर्पणाला आणि त्यांच्या कुटुंबाच्या यशालाही मनापासून दाद देणारी प्रेरणादायी संस्था असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पुरस्कार विजेते, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या."सेवेतील उत्कृष्टता हीच आमची ओळख आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान हीच आमची खरी ताकद," असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या