सांगली दि. ६: जय भवानी.. जय शिवाजी.. जय जिजाऊ... हर हर महादेव.. छ. शिवाजी महाराज की जय अशा घोषणा, लेझर शो चा नेत्रदीपक झगमगाट आणि डीजेच्या निनादात व अभंग रिपोष्टचे धडाकेबाज सादरीकरण, नेत्रदीपक लेझर शो आणि शानदार आतषबाजीने सांगली शिवमय झाली. "
आज मारुती चौकात छ. शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा ५ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.
प्रारंभी जिजाऊ वंदना आणि शिवगर्जना झाल्यावर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी व मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि अखंड शिवज्योतीचे पूजन करुन ज्योतीचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला गेला. भाजपा नेते आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी मान्यवर अतिथी आणि तमाम शिवप्रेमींचे स्वागत केले.याप्रसंगी पृथ्वीराजबाबा पाटील यांनी पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी यांचा सत्कार केला.
यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. आशिष शेलार यांचा शुभ संदेशयुक्त व्हिडिओ स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या संदेशात ते म्हणाले, कार्यबाहुल्यामुळे मी येऊ शकलो नाही. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून पृथ्वीराजबाबा पाटील यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा गौरवान्वित केली आहे. छ. शिवाजी महाराज हे भारताचे अराध्य दैवत आणि कल्याणकारी रयतेचा आदर्श प्रशासक राजे होते. सांगलीकरांच्या मनात त्यांच्या पराक्रमाविषयी असलेला आदर आणि भक्ती कौतुकास्पद आहे. सोहळ्यास माझ्या शुभेच्छा आहेत.
या निमित्ताने शिवसिंहासनाचा उभारलेला भव्य सेटअप महाराष्ट्राला प्रेरणा देणारा होता
यावेळी प्रास्ताविकात पृथ्वीराजबाबा म्हणाले, सांगली शहर व जिल्ह्य़ातील युवकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद कायम तेवत रहावा हा उद्देश ठेवून महाराजांचा दरवर्षी भव्य दिव्य स्वरुपात सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. गुलाबराव मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून, पुतळ्यासमोर पाच वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक दिनी छ. संभाजीराजे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या व रायगडावरून आणलेल्या रायगड, सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड व पन्हाळगडावरील पवित्र माती आणि कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचे पवित्र जल वापरुन देशातील पहिली अखंड शिवज्योत प्रज्वलित केली.
यंदा ३५३ वा शिवराज्याभिषेक व अखंड शिवज्योतीचा पाचवा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने साजरा होत आहे. या सोहळ्यात प्रचंड संख्येने उपस्थित सांगलीकर शिवप्रेमींचे मी ऋणी आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि राष्ट्र निर्माणाच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा पाचवा वर्धापन दिनातून नवी पिढी छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि ध्येयवादाने प्रेरीत होत आहे याचा आम्हाला निश्चितच आनंद व समाधान वाटतो. पवित्र शिवसिंहद्वाराची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे. दरवर्षी छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा, नाट्य, गीते, संगीत इ. उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा वर्धापन साजरा करुन छ. शिवाजी महाराजांच्या कार्याला मानाचा मुजरा केला जातो.यंदा अभंग रिपोष्टचे धडाकेबाज सादरीकरण, नेत्रदीपक लेझर शो आणि शानदार आतषबाजीने सांगली शिवमय झाली आहे "
यावेळी महापौर धीरज सुर्यवंशी, माजी आमदार दिनकरतात्या पाटील व नितीनराजे शिंदे व स्वाती शिंदे, भारतीताई दिगडे, नीताताई केळकर,स्वाती खाडे, युवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नितीन चौगुले, प्राजक्ता धोतरे, कीर्ती देशमुख, मनिषा कुकडे, प्राजक्ता कोळेकर, दिपाली पाटील, दिलीप पाटील, सुनिता शेरेकर, राजेंद्र कुंभार, सौ. विजया पृथ्वीराज पाटील,विश्वस्त विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील, फौंडेशन अध्यक्ष बिपीन कदम, मराठा समाज अध्यक्ष डाॅ. मोहन पाटील, सांगली शहर पोलीस निरीक्षक सुगावकर साहेब,
सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, डाॅ. संजय पाटील,अभिजित कोळी, रविंद्र सदामते, ,योगेश सुर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने,केदार खाडीलकर, प्रकाश पाटील,उदय बेलवलकर, दरीबा बंडगर, सुरेश बंडगर, युवराज गायकवाड, महाबळेश्वर चौगुले, राजेंद्र कुंभार, भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रा एन.डी.बिरनाळे सनी धोतरे, अजय देशमुख, चेतन कदम, प्रशांत अहिवळे, आशिष चौधरी, महावीर पाटील, महेश खराडे, स्मिता भटकर, ईषा साठे,उर्मिला बेलवलकर, हुल्याळकर मामा,ए. डी. पाटील, मनोहर परीट, श्रीकांत वाघमोडे, विकास पाटील,रामभाऊ पाटील, महेंद्र पाटील, प्रकाश व्हनखडे, अजित दुधाळ, प्राचार्य प्रताप भोसले आणि विविध क्षेत्रातील सांगलीकर शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या