प्रतिष्ठा न्यूज
सांगली : एनसीआरटीच्या आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सांगलीत ‘मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा’ काढण्यात आला. या निर्णयाविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असून सांगलीतील मोर्चात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अवमान होत असल्याचा आरोप करत, मराठ्यांचा इतिहास पुसण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला. एनसीआरटीने नकाशा वगळण्याचा निर्णय कायम ठेवल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आहे. मात्र, काहींच्या दबावामुळे इतिहासात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
युवा शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात सातारा राजघराण्यातील राजमाता कल्पनाराजे भोसले, सांगलीचे युवराज आदित्यराज पटवर्धन तसेच पानिपतमधून रोडमराठा रामनारायण, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असर्लेल्या प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांच्यासह स्वराज्यासाठी बलिदान देणार्या मावळ्यांचे वंशज सहभागी झाले होते.
आमदार जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्यांची मालिका सुरू असल्याची खंत व्यक्त केली. अशा वक्तव्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार विश्वजित कदम यांनीही इतिहासात जाणीवपूर्वक बदल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, हे प्रकार थांबवण्याची गरज अधोरेखित केली. चित्रपट आणि इतर माध्यमांतून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुरुवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लढलेल्या मावळ्यांचे वारसदार उपस्थित होते त्यांचु नावे अशी,
1)हिंदुराव बहिर्जी घोरपडे यांचे वंशज श्री.बहिर्जी घोरपडे गंजेंद्रगडकर
2)बजाजी निंबाळकर यांचे वंशज रणवीरसिंह बाळ निंबाळकर.
3)सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री.जयाजीराव मोहिते.
4)बहिर्जी नाईक यांचे वंशज श्री.दादासाहेब नाईक.
5)वीररत्न शिवा कशीद यांचे वंशज श्री.आनंदराव काशिद.
6)दिल्ली दिग्विजय वीर श्रीमंत सरदार महादजी बाबा शिंदे यांचे वंशज श्री.आशिषजी शिंदे.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित व सर्व पक्ष आणि संघटनांच्या उपस्थितांची नावे
आमदार जयंतराव पाटील, खासदार विशालदादा पाटील, आमदार विश्वजीत कदम, पद्माकर जगदाळे, जितेश कदम ,राजेश दादा नाईक , पृथ्वीराज बाबा पाटील, मंगेशदादा चव्हाण , मोहन वनखंडे, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतूल माने, अभिजीत हारगे, महेंद्र भाऊ चंडाळे, मयुर शेठ पाटील, युवराज गायकवाड, अभिजीत भोसले, वर्षा निंबाळकर, नितीन चव्हाण, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, शंभूराज काटकर,मयूर घोडके, उमेशभाऊ पाटील, आर एस पवार, योगेश सूर्यवंशी, उत्कर्ष खाडे, आशाताई पाटील, स्नेहाताई चौगुले , रजनीताई जाधव , कल्पनाताई शेळके आदी.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या