प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात यंदाचा बहुप्रतिक्षित “आंबा महोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दि. १४ मे ते १८ मे २०२६ या कालावधीत रंगणार असून, आंबा प्रेमींसाठी विविध दर्जेदार आंब्यांची खास पर्वणी ठरणार आहे.स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रोहित आर.आर.पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.महोत्सवात तासगावसह विविध भागांतील शेतकऱ्यांकडून दर्जेदार आणि स्वादिष्ट आंब्यांचे स्टॉल उभारले जाणार आहेत.ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून ताजे आंबे खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक उत्पादकांना मोठा बाजारपेठेचा आधार मिळणार आहे.या महोत्सवामुळे तासगावच्या कृषी बाजारपेठेला नवसंजीवनी मिळणार असून, आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महोत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंबा महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या