प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 12 : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1' अंतर्गत सांगली मंडळात दिनांक 15 मे 2026 रोजी मल्हार मल्टीपर्पज हॉल, भाटे महादेव मंदिर उत्तर शिवाजी नगर, बालाजी मिल रोड सांगली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, फोटो, संबंधित दस्तऐवज) शिबिर स्थळी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार, ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विषयक समस्यांचे त्वरित निराकरण बरण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा 1' राबविण्यात येत आहे. अपर तहसीलदार कार्यालय, सांगली अंतर्गत महसूल मंडळामध्ये 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत ही शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबीरामध्ये एकाच छताखाली, एकाच दिवशी विविध सेवा मिळणार आहेत.
या शिबीरांमध्ये "Single Day Service Delivery अंतर्गत पुढील कामे मार्गी लावली जाणार आहेत. उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपराचे तात्काळ वाटप, ७/१२ व ८-अ उताराः प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे आणि ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, नवीन सुधारणाः अकृषक (NA) वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी मानली जाईल. डिजिटल सेवाः ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ ची माहिती व वाटप. या अभियानाव्दारे पारदर्शक आणि सौजन्याने सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या