सांगली दि. ११:भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशान्वये त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. संतोष साखरे साहेब यांनी शिक्षक व पदवीधरांच्या जिल्हा स्तरापासून मंत्रालयीन पातळीपर्यंतच्या विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न व अन्य समस्या जाणून घेण्यासाठी आज दि. १२ मे रोजी आमराई रोडवरील हाॅटेल ककून येथे स. १० ते दु. २ या वेळेत शिक्षक व पदवीधरांसाठी जनता दरबारात शिक्षक व पदवीधरांच्या शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे व अन्य प्रश्नांची निवेदनं स्वीकारुन सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
जे प्रश्न तातडीने सोडवणे शक्य आहे, त्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तसेच मंत्रालयीन स्तरावरील प्रश्नात स्वतः मा. रविंदजी चव्हाण साहेब लक्ष घालणार आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील शिक्षक, पदवीधर यांनी वैयक्तिक प्रलंबित कामाची आणि संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व पदवीधरांच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित कामाबाबतची निवेदने व मागण्या लेखी स्वरूपात तीन प्रतीत तयार करून सदर दिवशी हाॅटेल ककून आमराई रोड सांगली येथे उपस्थित राहून सादर करणेबाबतची माहिती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली आहे.
शिक्षक व पदवीधरांनी आपल्या प्रलंबित कामाची निवेदनं
मा. रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्या नावे सादर करावीत.शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. तरी आपण आपल्या निवेदनासह अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन दौरा समन्वयक भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या