प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : पलूस कडेगाव तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांच्या मध्ये रोष वाढत आहे.गावो गावी होणाऱ्या शक्तीपीठ विरोधी निषेध सभांमधून अँड दिपक लाड यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. रविवारी दिनांक 17 मे रोजी सकाळी 7 वाजता नेवरी येथून शक्तीपीठ विरोधी पदयात्रा चे आयोजन केले असल्याची माहिती कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक अँड दिपक लाड यांनी माहिती दिली. बैलगाडी शेळ्या मेंढ्या सह शेतकरी पदयात्रेत सहभागी होणार आहेत ही आत्मक्लेष पदयात्रा नेवरी ता कडेगाव येथील आंबेगाव वडीये रायबाग शेळकबाव,भाळवणी शिरगाव देवराष्ट्रे कुंभारगाव कुंडल मार्गे घोगाव ता पलूस येथे समारोप होणार असल्याची माहिती श्रीदास होनमाणे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन पलूस कडेगाव शक्तीपीठ विरोधी समितीच्या वतीने अवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या