प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : राष्ट्राचे वैभव असणाऱ्या खेळाडूंचा नेहमीच सन्मान झाला पाहिजे. समाजातून त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची आमची नेहमीच भूमिका असते. असे मत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते प्रदीपआप्पा कदम यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र सॉफ्टबॉल अकॅडमी पलूसच्या वतीने संडे सॉफ्टबॉल लीग आयोजित करण्यात आली होती. याचे पारितोषिक वितरण प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी जगभर फार मोठे नाव केले आहे. अत्यंत कष्टातून खेळाडू नावलौकिक मिळवत असतात. सॉप्टबॉल खेळातील मोठया संख्येने शासकीय सेवेत आहेत. ज्या उन्हामध्ये सामान्य माणसाला उभे राहणे अश्यक्य आहे अशा उन्हामध्ये आपण खेळात आहात. यावरूनच तुमची खेळाविषयी असणारी आस्था दिसून येते. सॉप्टबॉल हा वेगळा खेळ आहे तो जपणाऱ्या खेळाडूंचे कोतुक आहे. पलूसमध्ये यापुढे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे सामने घ्यावेत आम्ही लागेल ते सहकार्य करू. असे आश्वासन प्रदीपआप्पा कदम यांनी दिले.
यावेळी यावेळी सॉप्टबॉल असोसिएशनचे अभय बिरजू, संतोष साळुंखे, अभिलाष शिसाळ, मंगेश दौन्डे , योगेश कुऱ्हाडे, शैलेश , तुकाराम धायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, अमीर भैय्या पठाण, सचिन कुऱ्हाडे, कु-हाडे, दौलत पाटील, विखे पाटील कृषी परिषदेचे विभागीय अध्यक्ष संजयकुमार शिंदे यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या