सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे, संस्थेचे संचालक आर्कि. विवेक देशपांडे, सौ. मेधा केळकर, भालचंद्र चितळे आणि शिबिर प्रमुख शशांक लिमये यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात 40 शिबिरार्थींचा सहभाग असून सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा आणि नवी मुंबई इथून आलेले बालकलाकार सहभागी झाले आहेत.
आर्कि. विवेक देशपांडे आणि आर्कि. नंदिनी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 मे ते 24 मे या कालावधीत संपन्न होणाऱ्या या शिबिरासाठी सौ धनश्री कुलकर्णी, सौ मुक्ता फडणीस, डॉक्टर दिलीप पटवर्धन, राधा आपटे, डॉक्टर अभय कुलकर्णी, उदय गोडबोले, डॉक्टर रंजना कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, शशांक लिमये यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिराचे संयोजन सागर देशपांडे, धनंजय खाडीलकर, सौ कल्याणी खाडीलकर, मयुरेश बडवे, रोनक सरनोबत, राजस बर्वे, सृष्टी करंदीकर, तन्मयी जोशी, तन्वी खाडिलकर, मनोज्ञा हुद्दार, स्वराज जोग, श्रावणी कुलकर्णी, सायली स्क्वेअर करत आहेत.
शिबिराची सांगता रविवार दिनांक 24 मे रोजी भावे नाट्यमंदिर येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी बालकलाकार आपला कलाविष्कार सादर करतील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या