सांगली प्रतिनिधी : लोककल्प फाऊंडेशनच्या वतीने दि. ३० मे २०२६ रोजी श्री हनुमान देवस्थान, तुंग येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १०० लाभार्थींनी आरोग्य सेवा व तपासणीचा लाभ घेतला.
आरोग्य तपासणीनंतर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सुदत्त पाठक यांनी संस्थेच्या विविध आर्थिक सेवा, योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच लोककल्प फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत आरोग्य जनजागृतीचे महत्त्व आणि आरोग्याची नियमित काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उषःकाल हॉस्पिटल, सांगली यांच्या डीएमओ डॉ. धनश्री बोरकर यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, संतुलित आहाराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर्फे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सुदत्त पाठक, क्षेत्रीय कार्यालय व्यवस्थापक श्री. सुभाष मोरे, प्रादेशिक मार्केटिंग व्यवस्थापक श्री. सूरज पाटील व सीएसआर सहाय्यक श्री. वैभव दाभाडे उपस्थित होते.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशनमार्फत विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत असून, या कार्याचे समाजातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री हनुमान देवस्थान समिती, स्थानिक नागरिक, वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या