प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : शोटोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया यांच्या वतीने नेपाळ येथे होणाऱ्या १७ व्या एनएसकेए या आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी पलूस येथील रूद्र राहूल पुदाले या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याचा सत्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
नेपाळ शोटोकान कराटे असोसिएशनद्वारे आयोजित आणि काठमांडू, नेपाळ येथे दिनांक २, ३ व ४ जून २०२६ रोजी १७ व्या NSKA आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेतील 'ज्युनियर' (Junior) गटाच्या स्पर्धा होत आहे. भारतीय कराटे संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रूद्र पुदाले यांची निवड झाली आहे.
याकरिता प्रदीपआप्पा कदम यांनी विशेष सहकार्य केले.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, समाजातील अनेक विद्यार्थी व खेळाडू परिस्थिती नसल्याने आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. यापुढे परिश्रमाची तयारी आणि गुणवत्ता असणारा कोणताही विद्यार्थी परिस्थितीने अडचणीत येणार नाही. जर कोणाला अडचण येत असेल तर आम्ही कर्तव्य म्हणून सहकार्य करून त्यांच्या यशस्वी होण्याचा मार्ग सुकर करू. खेळाडू आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी महेश कोरे, आमीर पठाण, संजयदादा शिंदे, अभिजीत कौलगे, कृष्णा मिठारी, तुषार सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या