प्रा.संजय ठिगळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के त्यांच्यासोबत डॉ. बी.एम.हिर्डेकर, डॉ.एम.एस.देशमुख, प्रा.सुभाष दगडे, शामराव पाटील, सुवर्णा ठिगळे, राजेश ठिगळे, ऋतुराज ठिगळे आदी मान्यवर
सांगली : व्या शतकात आपण ज्या वेगाने प्रगती करतोय त्या प्रगतीचा वेग पाहता आणि आजची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता मूल्यांचे जतन करणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हे तर जतन संस्कृती आणि जतन संस्कार विकसित करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर प्रा.संजय ठिगळे यांचे लिखाण जतन संस्कृतीला चालना देणारे आहे.असे मत वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
प्रा.संजय ठिगळे लिखित कधी मनातलं कधी जाणतलं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते सांगली येथील रोटरी क्लबच्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.बी.एम.हिर्डेकर होते.
बीजभाषक म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एम. एस.देशमुख व प्रा.सुभाष दगडे म्हणाले की, समाजातील आर्थिक व सामाजिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचविणाऱ्या लेखकांची समाजाला गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.बी.एम.हिर्डेकर म्हणाले की. वाढत चाललेला चंगळवाद आणि नैतिक मूल्यांचे होत चाललेले अध:पतन देशाच्या विकासाला मारक ठरते आहे. त्यादृष्टीने तरुणाईने सावध राहणे गरजेचे आहे.
लेखक म्हणून बोलताना प्रा.संजय ठिगळे म्हणाले की,चळवळीतील अनुभव असल्यामुळेच मला माणसाच्या मनातले ओळखता आले. विशेषकरून आर्थिक प्रश्नांची जाण आणि भान असल्यामुळेच लिखाण करता आले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत धर्मेंद्र पवार यांनी केले.या प्रसंगी लेखक प्रा.संजय ठिगळे व सुवर्णा ठिगळे त्याचबरोबर सातारचे नगरसेवक सुशांत महाजन व मातोश्री सुशीला ठिगळे यांचा कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले.उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले.
कार्यक्रमास भाग्यश्री पाटील कासोटे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वैजनाथ महाजन, सिव्हिल सर्जन डॉ.विक्रमसिंह कदम प्रा.शामराव पाटील, दी.बा.पाटील, प्रमोद चौगुले, प्राचार्य विवेकानंद रणखांबे,मालनताई मोहिते, नामदेव माळी त्याचबरोबर साहित्य आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या