सांगली प्रतिनिधी : बंद घराचे लॉक तोडून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अटक करत त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला असून आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) सुदर्शन सुनिल यादव (वय २३, रा. ऋतुगंध अपार्टमेंट, वारणाली, सांगली)
२) सार्थक सुनिल सुतार (वय २०, रा. रामरहीम कॉलनी, संजयनगर, सांगली)
३) मुनीब ऊर्फ बाब्या मुश्ताक भाटकर (वय २१, रा. शामराव नगर, सांगली)
तर मेघनाथ हिरालाम साहु (रा. पालवी हॉटेलजवळ, सांगली) हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी आरोपींकडून २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये डोले, ब्रेसलेट, चैन, येढण व झुबे असा सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज तसेच २०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दिनांक १७ मे २०२६ रोजी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संबंधित आरोपी चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी सह्याद्रीनगर ते शिंदे मळा रेल्वे ब्रिज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोकड मिळून आली. अधिक चौकशीत आरोपींनी विकास कॉलनी चाररस्ता परिसरातील बंद घर फोडून सुमारे महिनाभरापूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील उर्वरित दागिने फरार आरोपी मेघनाथ साहु याच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता संबंधित घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदर आरोपींवर यापूर्वीही मालमत्तेविषयक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह संदीप पाटील, प्रकाश पाटील, अतुल माने, अमोल ऐदाळे, श्रीधर बागडी, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, विनायक सनदी, रोहन घस्ते, सुरज थोरात, सतीश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या