मोर्शी- जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग अकोला मंडळ विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी मोर्शी, वरूड शहरात रक्तदान चळवळ राहून हजारो बॉटल रक्त संकलित करण्याचा विक्रम मोडला तसेच महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया तसेच हर्निया हायड्रोसील सारख्या सामान्य शस्त्रक्रिया करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.
डॉ सचिन कोरडे, डॉ पंकज मुळे, डॉ विवेक साबळे, डॉ संभावित, डॉ अंकुश झोडे, डॉ मानकर, डॉ ऋतुजा श्रीराव, डॉ मेघा झामडे,डॉ संगीता जैन, डॉ गिरीश धोटे, डॉ दिलीप टिंगणे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मनीष अग्रवाल, सुजित वानखडे,रितेश कुकडे, विनय शेलुरें, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, आशिष पाटील, प्रदीप पावडे, अमोल झाडे, चेतन देशमुख, नंदू थोरात, रूत लोखंडे, वर्षा दारोकर, विद्या पाटील जयश्री मोरे स्वाती बुरंगे वृषाली भगत, सुजाता पांडे, रेशमा बहुरूपी, प्रवीण कापडे, वसीम शेख इतर सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग अकोला मंडळ विभाग या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व डॉक्टर व रुग्णालयीन कर्मचाऱ्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या