प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्हायांच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक, जुना स्टेशन रोड येथे दि. 27 एप्रिल रोजी मीरा भाईंदर येथे हिंदूं बांधवाना धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने हल्ला गंभीर जखमी करणारा *जैब जुबेर अंसारी* याचा एनकाऊन्टर करून खात्मा करा व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे 15 मुलींवर अत्याचार करून त्यांचे लैंगिक शोषण करणारा लव्ह जिहादी *शाहिद समीर सनदी* याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी संतप्त निदर्शने करून हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने त्याचा प्रतीकात्मक एन्काऊंटर केला.
*यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदूंना धर्म विचारून कलमा पडायला लावून सुन्ता आहे का नाही पाहुण गोळ्या घातल्या व तेथील स्थानिक मुस्लिम लोकांनी त्यांना सपोर्ट केला, त्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून अतिरेक्यांचा खात्मा केला. मीरा भाईंदर येथे जैब जुबेर अन्सारी या जिहादी कट्टर पंथीय मुसलमानाने हिंदूं बांधवांना धर्म विचारून कलमा पडायला लावून चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला सरकारने दहशतवादी ठरवून त्याचा एन्काऊंटर करून खात्मा करावा. तसेच कोल्हापूर येथे पंधरा तरुणीचे लैंगिक शोषण करणारा लव्ह जिहादी *शाहिद समीर सनदी* याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्याला तुरुंगात टाकावे.
यावेळी जैब जुबेर अन्सारी याचा एन्काऊंटर करा व शाहिद समीर संधी याला मोका लावा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे चे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, बाळासाहेब मोहिते, मनोज साळुंखे, रावसाहेब खोजगे, अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, सोमनाथ गोटखिंडे, राहुल बोळाज, राम काळे, अजयकुमार वाले, विकास आवळे, धीरज कदम, महेश सायमोते, सुजित पाटील, संदेश खोत, शुभम देसाई, सुमित शिंगे, केतन शिंदे, प्रमोद चव्हाण, शिवाजी पाटील, प्राची कुदळे, प्रेम देसाई आधी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या