सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत नियुक्त फिरत्या दक्षता पथकांनी घरगुती गॅस सिलिंडर अवैधरीत्या वापरणाऱ्यांवर निर्बंध लादण्यासाठी धाडींचे प्रमाण वाढवले आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
पेट्रोल डिझेल चा आजचा साठा
सांगली जिल्ह्यात आज दिनांक 21 मे 2026 रोजी पेट्रोलचा 2515 किलोलिटर, डिझेल 2870 किलोलिटर तर एलपीजीचा 1264.2 मेट्रिक टन साठा शिल्लक असून 96.6 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिली.
जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1305 किलोलिटर, बीपीसीएलचा 690 किलोलिटर व एचपीसीएलचा 520 किलोलिटर असा एकूण 2515 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1420 किलोलिटर, बीपीसीएलचा 810 किलोलिटर व एचपीसीएलचा 640 किलोलिटर असा एकूण 2870 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 1096 मेट्रिक टन, आयओसीएलचा 55 मेट्रिक टन व बीपीसीएलचा 113.2 मेट्रिक टन असा एकूण 1264.2 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 96.6 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या