प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक 15 एप्रिल 2025 पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अध्याप फार्मर आयडी काढलेले नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी दिनांक 20 मे 2026 पर्यंत काढण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित 78 हजार 940 लाभार्थ्यांनी दिनांक 20 मे 2026 पूर्वी फार्मर आयडी काढावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण 4 लाख 210 लाभार्थी पात्र असून त्यापैकी 3 लाख 21 हजार 270 लाभार्थ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. उर्वरित 78 हजार 940 लाभार्थ्यांनी अजूनही फार्मर आयडी काढलेला नाही. राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अँग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात येत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या