प्रतिष्ठा न्यूज
मिरज : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी विद्यार्थी परिषद स्थापनेचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्त,जबाबदारी आणि नेतृत्वगुणांचे उत्कृष्ट दर्शन घडवले या कार्यक्रमासाठी आकाश बनसोडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ते गेले 5 वर्ष खेलो इंडिया खेलो चे प्रशिक्षक आहेत.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टीन , प्रशासक रफिक तांबोळी,उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक अश्विनी येळकर तसेच शिक्षकवर्ग आणि पालक उपस्थित होते. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना पदचिन्हे व बॅज देऊन सन्मानित करण्यात आले. वेदांत वनखडे (Head Boy) याने विद्यार्थी परिषदेतील सर्व सदस्यांना प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ दिली.मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टीन , यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना नेतृत्व करताना प्रामाणिकपणा, सहकार्य आणि समर्पण यांचे महत्त्व पटवून दिले,तसेच चंद्र गाठण्याचा ध्यास ठेवा आणि तारकांमध्ये तेजाने चमकत रहा असे प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वावाढवला.“विद्यार्थी परिषद ही शाळेची धुरा सांभाळणारी एक सक्षम टीम असून, तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढते,” असे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध वातावरण, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा यांचे सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील खेळाचे शिक्षक अमोल जाधव, चंद्रशेखर मिरजे, राजेश कुरणे आणि दिक्षा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या भव्य सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या नेतृत्व क्षमतेला नवी दिशा मिळाली असून, शाळेच्या उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्र पाटील, समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. असा हा उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या