पुणे प्रतिनिधी : हिवताप विभागाचे खातेप्रमुख मा.डाॅ. संदीप सांगळे सर सहसंचालक आरोग्य सेवा (हि. ह. व जरो ) पुणे यांचे दालनात महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. नं. २९३४ चे शिष्ठमंडळाची बैठक संपन्न झाली. प्रस्तावित मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली. शिष्ठमंडळामधे राज्याध्यक्ष श्री डी एस पवार, राज्य सरचिटणीस श्री पुरुषोत्तम आडेप, राज्य कार्याध्यक्ष श्री प्रदीप चंदे,राज्य उपाध्यक्ष श्री. दिपक गोतमारे, सल्लागार श्री. एस.सी माणिकपुरे, श्री कैलास ढगे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित मागण्यामध्ये :- १) दि. १६ फेब्रुवारी २०२४ चे शासन परिपत्रक रद्द करण्याबाबत या संघटनेकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असुन मा.आरोग्य मंत्री महोदय यांचे सोबत सुद्धा चर्चा झाली आहे. तथापि अद्यापही प्रस्तावावरील निर्णय प्रलंबित असल्याने पदोन्नतीची प्रकरणे रखडलेली आहेत उलट जिल्हा परिषद विभागातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती नियमित होत असल्याने हिवताप योजनेतील सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर प्रस्तावित मागणी बाबत सविस्तर प्रस्ताव शासनास सादर केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी हाताळण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणी येत असल्याने पदोन्नती प्रकरणे रखडली असल्याचे शासनाचे निदर्शनास आणून दिले असल्याचे त्यांनी सांगितले व लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता दर्शविली. २) सुधारित आकृतीबंध व नवीन सेवा प्रवेश नियमाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.३) सन 2026 च्या सर्वसाधारण बदल्या समुपदेशाने करण्यास याव्यात ४) हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांची आस्थापना जैसे थे ठेवण्यात यावी. ५) क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीची करण्यात येऊ नये
६) दिनांक 16 /2 /2024चे शासन 👌 नुसार गट क व ड चे नियुक्ती प्राधिकारी विभागीय उपसंचालक यांची नियुक्ती केली असल्याने आरोग्य कर्मचारी ,आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी येत आहे त्यामुळे सदर शासन निर्णय रद्द करण्यास या संघटनेची आग्रही भूमिका असुन त्यावर त्वरित कार्यवाही होणेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा
७)तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये जुन्या आकृती बंधाप्रमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये हिवताप विभागातील मंजूर असलेले आरोग्य निरीक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांचीे पदस्थापना आपले स्तरावरून त्वरित करण्यात यावी .
८) फिरती करणार्यां कर्मचाऱ्यांचे कायम प्रवास भत्यामधे वाढ करण्यासाठी शासनाकडे योग्य प्रस्ताव सादर करणे
९) वाढत्या लोकसंख्येप्रमाणात आरोग्य कर्मचारी,आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गाची नवीन प्रा.आ.केंन्द्राप्रमाने राज्य स्तरीय पदे निर्माण करणेत यावीत.
१०) सन २०२६ चे सर्वसाधारण बदल्या समुपदेशनानेच करण्यात याव्यात
११)आरोग्य कर्मचारी संवर्गाचे पदनाम ग्राम आरोग्य अधिकारी तर आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी (हिवताप) याप्रमाणे करण्यासाठी शासनाकडे संघटनेचे मागणी नुसार प्रस्ताव सादर करावा.
१२) हिवताप विभागामध्ये आदर्श कर्मचारी पुरस्कार योजना सुरू करण्यात यावी
१३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले तिसऱ्या लाभाची प्रकरणे, रजा प्रवास सवलत,स्वग्राम प्रवास देयके व इतर प्रलंबित देयके मासिक आढावा घेऊन निकाली काढण्यास संबंधितांना निर्देश देण्यात यावे.
१४) सुधारित आश्वासित प्रगती योजने अंतर्गत १०,२०,३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात यावे.
१५) आंतरमंडळ बदल्याची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत .
१६)आरोग्य कर्मचारी संवर्गास वेतन त्रुटी बक्षी समितीने मंजूर केल्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे एस -८ वरून एस -९ मधे वेतन निश्चिती चे लाभ अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही देण्यात आले नाहीत त्याबाबत योग्य निर्देश देण्यात यावे.
१७)सहाव्या वेतन आयोगामध्ये उत्कृष्ट कामाबाबत मिळालेल्या आगावू वेतन वाढीबाबत न्यायालयीन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लाभ मंजूर करण्यात यावे.
१८) नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचारी पदावरील पदोन्नतीचा कोटा १० ऐवजी २५% करण्यात यावा व पदोन्नती प्रकरणे विभागीय स्तरावरून त्वरित निकाली काढण्यात यावीत
१९) हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी हे हंगामी स्वरूपात १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियमित समय श्रेणीमध्ये कार्यरत असल्याने व त्यांची नियमित नियुक्ती कोट्याप्रमाने आरोग्य कर्मचारी या पदावर झाली असल्याने त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी या सर्व मागण्यावर विस्तृत चर्चा झाली म्हणून डॉ. सांगळे सरांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवुन प्रशासन स्तरावरील मागण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे व शासन स्तरावरील मागण्याबाबत पाठपुरावा करण्याची शाश्वती दिली त्यानंतर सभेची सांगता झाली.
ही संघटना कर्मचाऱ्यांचे न्याय,हक्क, सन्मान व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून कर्मचार्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. भविष्यातही अधिक ताकदीने प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र न 29 34 ही कटिबद्ध असल्याचे राज्याध्यक्ष श्री डी एस पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाराने कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या