प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ९ : सांगली पाटबंधारे मंडळांतर्गत आरफळ कालव्याचे उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात व वेळेत पाणी वाटप होण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार आरफळ कालवा कार्यक्षेत्रात दि. 9 एप्रिल 2026 ते 31 मे 2026 कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे. आदेशात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शेळकबाव, शिरगाव, वांगी, रामपूर, पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस, कुंडल, खानापूर तालुक्यातील भाळवणी, कमळापूर, आळसंद, तांदूळवाडी, वाझर, बलवडी व तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, बोरगाव, लिंब, विसापूर, पानमळेवाडी, शिरगाव (वि), ढवळी, तासगाव, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बेंद्री, शिरगाव (क), नागाव कवठे, कुमठे, निमणी, येळावी, राजापूर, तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 100 मीटर अंतरावर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजीचे 00.01 वाजल्यपासून ते दि. 31 मे 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास व एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या