सिद्धेवाडी : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील मध्यम प्रकल्प तलावातून ऐन कडक उन्हाळ्यात खास लोकांच्या आग्रहात्सव अग्रणी नदीला पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यामध्ये सावळज येथील सावळसिध्द विकास सोसायटीच्या विशेष सहकार्यामुळे हे पाणी सोडण्यात आले, यामध्ये सावळसिध्द विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ तसेच शेतकरी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
यासाठी माजी खासदार संजय (काका) पाटील यांचे खंदे समर्थक तासगाव पंचायत समितीचे सदस्य ऋषिकेश भाऊ बिरणे यांची शेतकऱ्यां प्रति असलेली तळमळ व खा. संजय काका पाटील यांच्याकडे सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे अग्रणी नदीस पाणी सोडण्यात यश आले.
कडक उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई असताना देखील अग्रणी नदीस पाणी सोडल्यामुळे येथील बळीराजा सुखावला आहे येथील द्राक्ष शेतीसाठी हे पाणी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याने येथील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या वेळी पंचायत समिती सदस्य पै. ऋषीभाऊ बिरणे, सावळसिध्द विकास सोसायटीचे चेअरमन बंडू पाटील विनायक पवार, दत्ता पाटील, संदीप माळी, मनोज माळी, सुनील भोसले, समजिक कांबळे, योगेश कांबळे, अमोल सावंत आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या