प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
पुणे : महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच आता राज्यातील एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही प्रवाशांना परवडणाऱ्या दरात चहा-नाश्ता मिळणार आहे. सर्व प्रवाशांना केवळ ४० रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्याची योजना १ जूनपासून राज्यभर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
पुणे विभागातील विविध एसटी बसस्थानकांना भेट देत मंत्री सरनाईक यांनी उपहारगृहांची पाहणी केली तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी एसटी प्रशासनाला सेवा सुधारणा, स्वच्छता, दर्जेदार अन्न आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
या नव्या योजनेमुळे एसटी प्रवाशांना कमी दरात स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. तसेच बसस्थानकांवरील उपहारगृहांची गुणवत्ता सुधारण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी प्रशासनाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली असून, राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या