मोर्शी प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक मा डॉ प्रमोद पोतदार, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ जुनेद यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येऊन शहरातील अण्णासाहेब कानफाडे विद्यालय येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती करण्यात येऊन हिवतापाविषयी माहिती देण्यात आली वैद्यकीय अधीक्षक मा डॉ प्रमोद पोतदार यांच्या हस्ते गप्पी मासे सोडण्यात येऊन शहरातील डास उत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले रुग्णालयातील ओपीडी मध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येऊन त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे यांनी हिवतापा बाबत रुग्णांना तसेच नातेवाईकांना माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिसेविका वर्षा दारोकर यांनी केले.
यावर्षीचे हिवताप दिनाचे घोषवाक्य "हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे आता केलेच पाहिजे" याविषयी जनजागृती पर माहिती देण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी पंकज मुळे रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, प्रकाश मंगळे, नंदू थोरात, ऋषिकेश दहेकर, अक्षय शेवाळे, डहाके, आशिष पाटील, योगेश महाजन , सुजित वानखडे, रितेश कुकडे, अमोल झाडे, कविता इंगोले, जयश्री मोरे, पाटील सिस्टर, कल्पना पंधरे,अर्चना पवार, भारती बाकडे, पुष्पा पंधरे व रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी हजर होते,
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या