हातकणंगले प्रतिनिधी : मिणचे (ता. हातकणंगले) येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव स्वामी सर्वहिताय बहुद्देशीय संस्था, कोल्हापूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने प्राथमिक आश्रमशाळा, मिणचे येथे आयोजित करण्यात आलेला खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती निलेश साळोखे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राहुल सावर्डेकर, संचालक नितीन कदम, उमेश पाटील, दीपक गोंधळी, महेश वडार, योगेश कांबळे, सूरज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापक नीलेश बिचकर यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या