सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई संभाजीराव पाटील, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती ऋषिकेश (दादा) लाड, समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर यांचा सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा बोलत होत्या.
सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम आदर्शवत असून स्पर्धा परीक्षांच्या मधील व सर्व उपक्रमामध्ये सांगली जिल्हा कायम अग्रेसर राहिलेला आहे. शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी व प्रशासन यांच्या एकत्र प्रयत्नातून जिल्हा राज्यात अव्वल आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषदेने सांगितले.
दरमहा शिक्षणाधिकाऱ्यांच्या बरोबर एक वेळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दोन महिन्यातून एक वेळ शिक्षकांच्या प्रश्नांवर बैठकीची मागणी यावेळी सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली.यावर अध्यक्षा यांनी पदाधिकारी याबाबत अनुकूल असल्याचे सांगितले.
अध्यक्षा,उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस सदाशिव वारे सहसरचिटणीस शशिकांत पाटील यांनी शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय कामांचा ताण, BLO नी करावयाच्या एसआयआर मॅपिंगमुळे ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांची होत असलेली ससेहोलपट, जनगणना, भरमसाठ ऑनलाईन कामे तसेच इतर विविध उपक्रमांची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
सहसरचिटणीस सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती शशिकांत पाटील,अध्यक्ष महेश शरणाथे,उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख,कार्याध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस सदाशिव वारे, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, अरविंद गावडे, प्रमोद काकडे, मुरलीधर दोडके, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, मनोहर साबळे, रमेश पेटकर, अजय राक्षे, ज्ञानदेव भोसले यांचा समावेश असलेली समन्वय समिती शिक्षकांचे प्रश्न एकत्रित मांडले जाऊन त्यांचा निपटारा शक्य तितक्या लवकर होऊन शिक्षण क्षेत्राला गती मिळावी यासाठी कार्यरत आहे .अतिरिक्त कामांमुळे अध्यापनासाठी आवश्यक वेळ कमी पडत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर शेजारील जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातीलही शिक्षकांना एक तारखेला वेतन मिळावी अशी ही आग्रही मागणी केली.
सन्माननीय अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, समन्वय समितीमधील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि शिक्षकांच्या समस्या सोडविणे याचा प्राधान्याने विचार केला जाईल तसेच जिल्ह्यामध्ये एकसूत्रीपणा आणून सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना बीएलओ व जनगणनेत सामावून घेण्यासाठी व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष व शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, समन्वय सरचिटणीस व प्रोटान विंग सांगली चे जिल्हाध्यक्ष सदाशिव वारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व समन्वय समितीचे सहसरचिटणीस शशिकांत पाटील, जत शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, उपाध्यक्ष अविनाश सुतार, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोलणकर, प्रमुख कार्यवाहक श्रवणकुमार कोरे, कवठेमंकाळचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ओलेकर, महेंद्र माने, शहनवाज हुसेन मणेर, अशोक काळे, ऋषिकेश तांबडे व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या