प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्यास्वरांनी गाजविणाऱ्या, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांना सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जनसंपर्क कार्यालयात आयोजित या शोकसभेत राजकीय, सामाजिकआणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आशाताईंच्या स्मृतींनाअभिवादन केले.कार्यक्रमाच्यासुरुवातीला आशाताईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संपूर्णवातावरण भावूक झाले होते. उपस्थित मान्यवरांनी आशाताईंच्या अष्टपैलू गायकीचा आणिजागतिक स्तरावरील त्यांच्या योगदानाचा गौरव केला.यावेळी बोलतानाआमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, "आशाताई भोसलेयांचे जाणे ही संगीत विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांनी केवळ गाणीगायली नाहीत, तर भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर एक वेगळीओळख मिळवून दिली. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी संगीताचीश्रीमंती वाढवली असून, त्यांच्या कलेचा वारसा पुढील अनेकपिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल."यावेळी उपस्थितकार्यकर्त्यांनी व सांगलीकर नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्यागायिकेला आदरांजली वाहिली. आशाताईंच्या संगीतमय प्रवासातून प्रेरणा घेऊनसांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्तकरण्यात आला.यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, नगरसेवक उदयबेलवलकर, माजी नगरसेवक मनोज सरगर, संजयकुलकर्णी, प्रविण कुलकर्णी, ओबीसी मोर्चाजिल्हाध्यक्ष हर्षल फल्ले, राहुल पाटील, सुहासकलघुडगी, नीलेश हिंगमिरे, अश्रफ वांकर, राजूचव्हाण (आवटी), संजय परमणे यांच्यासह पदाधिकारी व नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या