हातकणंगले प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “संविधान समता रॅली”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पेठवडगाव येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
ही रॅली पेठवडगाव – तासगाव – मिनचे – सावर्डे – नरंदे – कुंभोज – नेज – आळते – मजले – माणगाव या मार्गाने काढण्यात आली. मार्गातील विविध गावांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रॅलीचे उत्साहात स्वागत केले.
रॅलीदरम्यान भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देत संविधान प्रतींचे वाटप तसेच साखर-पेढ्यांचे वितरण करण्यात आले. समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिव स्वामी सर्वहिताय बहुद्देशीय संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात अध्यक्ष राहुल सावर्डेकर, संचालक नितीन कदम, प्रा. अंकुश कुरणे, योगेश कांबळे, उमेश पाटील, प्रवीण चव्हाण, सुहास तोडकर यांच्यासह अजित कांबळे, राकेश कांबळे, सौरभ कांबळे, सागर कांबळे, जय सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अरुण जमने यांनी सरबत देऊन रॅलीचे स्वागत केले. तसेच अक्षय कोठावळे, सुरेश सावर्डेकर, भागवत कांबळे, रितेश कांबळे, राहुल मोरे, मिलिंद सनदी, धीरज नेजकर, किशोर बनसोडे, वैशाली कांबळे आदींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रॅलीचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मार्गदर्शक, संचालक मंडळ, स्वयंसेवक आणि नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. एकूणच, ही संविधान समता रॅली समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरत अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या