प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करण्याचा तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपा नेते श्रीकांत तात्या शिंदे, मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, जिल्हा सचिव उदय मुळे, ग्रामपंचायत सदस्य गणपती साळुंखे, जिल्हा सदस्य भूपाल सरगर, कुणाल संकपाळ, सुनील भोसले, शुभम देसाई, गौस पठाण, आयुष देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या