मिरज : महादेव कॉलनी, मिरज येथे घरेलू कामगार महिला बचत गटांच्या वतीने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी इचलकरंजी येथील साथी रोहित दळवी यांनी चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत अंधश्रद्धेविरोधात जागृती केली व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच अॅड. वैभवी आढाव यांनी गाणी आणि संवादाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची आठवण करून देत महिलांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमात उपस्थित महिलांना आयोजकांच्या वतीने भडंग व चहा देण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना गुरव यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन रुपाली कांबळे, पूजा पागद, अर्चना गुरव, जोश्ना गाडावे, सविता कांबळे, अक्कताई वंजारी, आशा प्रसाद आणि वैशाली कांबळे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या