प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगर परिषदेतर्फे शहरातील परशुराम माळी सभागृहात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वावलंबी भारत अभियान संघटनेच्या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ विजया पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद सुतार यांनी भारतीय संस्कृतीत महिलांना नेहमीच सन्मानाचे स्थान असल्याचे सांगितले.राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले यांसारख्या महान महिलांनी इतिहास घडवून समाजाला दिशा दिली,असे त्यांनी नमूद केले.स्वावलंबी भारत अभियानाचे प्रकल्प अधिकारी राजाभाऊ शिंदे यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.सुरक्षित नोकऱ्यांच्या मागे न धावता महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा,त्यासाठी संघटनेतर्फे मार्गदर्शन आणि सहकार्य दिले जाईल,असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ पाटील यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सन्मानासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.कार्यक्रमात उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास नूतन महिला नगरसेविका तसेच नगर परिषदेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या