सांगली प्रतिनिधी : गांजा विक्री करणारे रेकॉर्डवरील २ आरोपी जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून ७ किलो ०९७ ग्रॅम वजनाचा गांजा व मोटरसायकल असा एकूण २,६३,२१०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
आरोपीचे नांव पत्ता
१) विजय शिवाजी पवार, वय २८ वर्षे, रा. कडेगाव नगरपंचायत पाठीमागे, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली.
२) अमीर युनूस मुल्ला, वय ३२ वर्षे, रा. मुल्ला वाडा, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-*
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने दिनांक ०९/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथकामधील पोकों / संकेत कानडे, पोहेकॉ प्रकाश पाटील आणि पोकों / ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे विजय पवार व अमीर युनूस मुल्ला दोघे रा. कडेगाव हे तयार गांजा माल विक्री करणेकरीता कडेगाव ते कडेपूर हायवेवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, कडेगाव ते कडेपूर हायवेवरील राजवीर मंगलकार्यालयाजवळ सापळा लावून थांबले असता दोन इसम मोटार सायकलवरुन येवून थांबलेले दिसले. त्यावेळी पथकातील स्टाफने रेकार्डवरील आरोपी नामे विजय पवार व अमीर मुल्ला असल्याचे ओळखल्याने लागलीच सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व पथकाने त्यांना पळून जाणेची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) विजय शिवाजी पवार, वय २८ वर्षे, रा. कडेगाव नगरपंचायत पाठीमागे, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली. २) अमीर युनूस मुल्ला, वय ३२ वर्षे, रा. मुल्ला वाडा, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली असे सांगितले.
सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, विजय पवार याचे पाठीवरील सॅकमध्ये वरील वर्णनाचा तयार गांजा माल मिळून आला. त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी विजय पवार यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता तो व त्यांचा सोबत असले अमीर मुल्ला याने सदरचा गांजा माल हा अक्षय मदने रा. म्हसवड जि. सातारा याचेकडून जादा दराने विक्री करणेकरीता आणला असल्याची कबुली दिली.
लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी गांजा माल व ताब्यातील मोटार सायकल पंचासमक्ष जप्त केली आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कडेगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पी.एस. जाधव कडेगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहवा / संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, मच्छीद्र बर्डे, अरुण पाटील, उदयसिंह माळी, संदीप गुरव, रणजीत जाधव, चापोहेकॉ / शिवाजी शिद,
पोकॉ/ संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अभिजीत माळकर, सुरज थोरात, चापोकों / सुशांत चिले. पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या