सांगली प्रतिनिधी : वादग्रस्त एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने कँडल मार्च निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला आघाडी नेत्या शैलजा पाटील केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला.
बाल लैंगिक शोषण आणि इतरही वादग्रस्त नोंदी असलेल्या एपस्टिन फाईलमध्ये ज्या ज्या देशातील राजकीय व्यक्तींची नावे आली त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या हरदीप पूरी यांचे नावही या फाईल मध्ये आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदीप पूरी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शैलजा पाटील यांनी केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, करुणा सॅमसन, आशा पाटील, आरती गुरव, कविता बोंद्रे, अनिता माने, डॉ. प्रतिमा मोहिते, समीना मुल्ला, गीतांजली पाटील, डॉ. विद्या घाटगे, अश्विनी कोळेकर, नीता सर्जे, अजित ढोले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या