प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये 16 मार्चपासून सकाळ सत्रात शाळा असली तरीसुद्धा सांगली जिल्ह्यातील आटपाडी व जतचा प्राधान्याने विचार करता सोलापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यात नऊ तारखेपासून सकाळची शाळा सुरू करावी अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीने केली होती.
सहसरचिटणीस सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती शशिकांत पाटील, अध्यक्ष महेश शरणाथे, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख, कार्याध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस सदाशिव वारे, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली 17 संघटनांनी सकाळ सत्रात शाळेची मागणी केली होती.*
*सर्व जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, अरविंद गावडे, प्रमोद काकडे, मुरलीधर दोडके, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, मनोहर साबळे, रमेश पेटकर, अजय राक्षे, ज्ञानदेव भोसले यांनी केलेले आवाहनाला शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.*
*दैनंदिन कमाल तापमान 36 अंशाच्या वर गेले असून सांगली जिल्ह्याची शैक्षणिक कमान शिक्षकांनी सातत्याने चढती ठेवलेली असून चौथी आणि सातवी स्कॉलरशिप यावर्षी 26 एप्रिल ला होणार असल्यामुळे यावर्षी शाळेला सुट्टी लागेपर्यंत शिक्षकांना सातत्याने काम करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी तात्काळ सकाळ सत्रात शाळेची मागणी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली होती.*
*शाळेची वेळ सकाळी 7 ते 11.45 अशी राहील. तसेच RTE act 2009 नुसार विहित मुदतीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तसेच आवश्यक तासिका पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील,ही बाब सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या खाजगी प्राथमिक शाळांनाही लागू राहील याची संबंधित घटकांनी नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.*
*विशेषतः जत-आटपाडी तालुक्यातून तसेच सर्व जिल्ह्यातून शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताची व आरोग्याची भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे यांच्या नेतृत्वाखाली 17 संघटनांच्या समन्वय समितीने केलेल्या पाठपुराव्याबाबत शिक्षकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या