प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील सर्व नागरिक व पात्र मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाच्या Voter Search मोबाईल अॅपद्वारे स्वतःची मतदार माहिती तपासावी,असे आवाहन तहसीलदार तासगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे.मतदारांना मतदार यादीतील माहिती सहज व सुलभरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने विशेष क्यू.आर. (QR) कोड तयार करण्यात आला आहे. सदर क्यू.आर. कोड स्कॅन केल्यास थेट Voter Search अॅप किंवा मतदार माहिती तपासणी पृष्ठावर प्रवेश मिळणार असून, यामधून मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, मतदान केंद्राचा पत्ता,मतदान केंद्र क्रमांक तसेच इतर आवश्यक तपशील तपासता येणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व अचूक रितीने पार पडण्यासाठी तसेच कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये,यासाठी प्रत्येक मतदाराने आपली माहिती तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.क्यू.आर.कोडच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.
तासगाव तालुक्यातील सर्व नागरिक व मतदारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्यू.आर.कोडचा वापर करून Voter Search अॅपद्वारे आपली मतदार माहिती तपासावी व निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती सविता लष्करे, निवडणूक निर्णय अधिकारी व अतुल पाटोळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या