प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 61 आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुती किंवा महाविकास आघाडीला एका फक्त एका सदस्याने पाठिंबा देणे आवश्यक आहे. आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एक उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे संजयकाका पाटील यांच्या हाती असलेल्या किल्लीनेच सत्ता स्थापनेसाठी सभागृहाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. म्हणून संजयकाकांचे कार्यकर्ते म्हणू लागले आहेत, "आता कसं संजय काका म्हणतील तसं!"
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापनेचा चंग बांधला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष 18 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 16 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. 61 सदस्यीय सभागृहात मित्रपक्षांसह महायुतीचे संख्याबळ 31 होऊ शकते . परंतु महाविकास आघाडी 30 जागांवर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एका सदस्याचे पाठबळ
निर्णायक ठरणार आहे.
अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत माजी खासदार संजयकाका पाटील हेच ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. ते जे ठरवतील त्यांचीच सत्ता जिल्हा परिषदेत येईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीतून संजय काकांच्या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या 6 जागा वजा केल्यास महायुतीची बेरीज पुरेशी होत नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 30 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची गरज आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या 6 जागांचे महत्त्व वधारले आहे. सत्ता स्थापनेसाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरेल. म्हणजे आता कसं संजय काका म्हणतील तसं! अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
वरीष्ठ पातळीवर यावर काय ठरणार आणि काय आदेश येणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा जोरदार खेळ चालणार आहे असे दिसते. अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेत संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार
*जिल्हा परिषद पक्षनिहाय संख्याबळ :*
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 18
भाजप – 16
काँग्रेस – 11
शिवसेना (शिंदे) – 7
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 6
शिवसेना (ठाकरे) – 1
रयत क्रांती – 1
जनसुराज्य शक्ती – 1
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या