प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दि तासगांव अर्बन को-ऑप.बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये धवल कामगीरी करत रु.६ कोटी २८ लाख इतका नफा मिळविलेला आहे.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बँकेने ३०० कोटी ठेव वाढीचे उद्दिष्ठ ठेवले होते.आपले ठेव वाढीचे ध्येय साध्य करत बँकेने रु.३०५ कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे.सन २०२४-२५ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ४११ कोटी होता तो सन २०२५-२६ अखेर रु. ४८६.८२ कोटी इतका झाला आहे.बँकेच्या व्यवसायामध्ये सतत वाढ होत आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम असून आपणा सर्वांच्या सहकार्याने बँकेची प्रगतीपतावर सतत वाटचाल सुरु असलेचे अध्यक्ष कुमार शेटे यांनी सांगीतले आहे.
दि.३१/०३/२०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रक्कम रु.३०५.०८ कोटी इतक्या झाल्या आहेत.बँकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घटकांना कर्ज पुरवठा केलेला असून माहे मार्च २०२६ अखेर बँकेकडील एकूण रु. १८१.७४ कोटी इतक्या रक्कमेचा कर्ज पुरवठा केला आहे.माहे मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु. १५०.१८ कोटी इतकी आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या सर्व मार्गदर्शक सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करत बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये नेत्रदिपक प्रगती साध्य केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर किमान १२ टक्के असने बंधनकारक असताना आपले बँकेचा सीआरएआर १८.०० टक्के इतका भक्कम आहे.आर्थिक वर्षाखेरीस बँकेचे ग्रॉस एनपीए प्रमाण ४.१० टक्के इतके असून आपली परंपरा कायम राखत याही वर्षी बँकेने निव्वळ एनपीए प्रमाण ० टक्के राखलेले आहे.बँकेने सभासद, ठेवीदार,कर्जदार व हितचिंतक यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आजपर्यंत मा.संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करुन बँकेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा पार केलेला आहे.या मोलाच्या सहकार्याबाबत अध्यक्ष यांनी बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार,कर्जदार व बँकेचे हितचिंतक या सर्वांचे आभार व्यक्त केले.तसेच येथून पुढेही असेच सहकार्य लाभावे असे उपाध्यक्ष अनिल कुत्ते यांनी आपले मत व्यक्त केले.सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये अधुनित तंत्रज्ञानाचा अवलंब हा खुप वाढलेला आहे. संचालक मंडळाने ग्राहकांना बदलत्या विविध अधुनिक तंत्रज्ञानानुसार सेवा पुरविणेसाठी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेने ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरु केलेली आहे.मोबाईल बँकिंग सेवा सुरु करणेस मंजुरी मिळणेसाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविणेत आला असून रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर लवकरच मोबाईल बँकिंग सेवा सुरु करीत आहोत.यावेळी बँकेचे अध्यक्ष कुमार शेटे,उपाध्यक्ष अनिल कुत्ते, संचालक महेश्वर हिंगमिरे,सदाशिव शेटे, अरुण पाटील, विनय शेटे, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर सीए, ॲड आशिष अडगळे, संचालीका श्रीमती सविता पैलवान, सौ.उमा हिंगमिरे व्यवस्थापन मंडळ सदस्य अवधूत गडकर, रविंद्र देवधर, प्रदिप पवार तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, असि.जनरल मॅनेज विनायक मेंडगुले, नारायण सगरे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या